Wed, Jul 24, 2019 02:15होमपेज › Ahamadnagar › नगर पुन्हा गारठले

नगर पुन्हा गारठले

Published On: Jan 23 2018 1:18AM | Last Updated: Jan 22 2018 11:29PMपुणे : प्रतिनिधी

राज्यात गेल्या 3-4 दिवसांपासून थंडीचा कडाका पुन्हा एकदा वाढला असून, सोमवारी बोचर्‍या थंडीने नागरिक कुडकुडून गेले. नीचांकी किमान तापमानाची नोंद नगर येथे 9.4 अंश सेल्सिअस एवढी करण्यात आल्याने नगरकर अक्षरशः गारठून गेले. तर पुणे 10.6, मुंबई 17, रत्नागिरी 17.1, कोल्हापूर 15.9, नाशिक 10.8, सांगली 13.6, सातारा 11.4, सोलापूर 16.4, औरंगाबाद 10.8, नागपूर 10.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय, तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किंचित घट झाली. मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाल्याचे हवामान विभागाने नमूद केले. उत्तर भारतात गेल्या दीड महिन्यापासून कडाक्याची थंडी पडली असून, सोमवारीदेखील ती कायम होती.

दिल्लीचा पारा सोमवारी 5.9 अंशांपर्यंत खाली उतरला. दरम्यान, पुढील 2-3 दिवस मध्य महाराष्ट्रात हुडहुडी कायम राहणार असून, नगर, नाशिक, पुण्यात किमान तापमान 10 अंशांच्या घरात राहील, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.