Wed, Apr 24, 2019 08:29होमपेज › Ahamadnagar › नगर शहर, उपनगराचा  पाणीपुरवठा विस्कळीत!

नगर शहर, उपनगराचा  पाणीपुरवठा विस्कळीत!

Published On: Jan 15 2018 1:40AM | Last Updated: Jan 14 2018 10:52PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

मुळानगर-विळद-नागापूर शहर पाणी योजनेला वीजपुरवठा होणार्‍या महावितरणच्या एमआयडीसी येथील 132 केव्ही वीज उपकेंद्रावर ब्लास्ट झाल्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला आहे. काल (दि.14) सायंकाळी 7.15 वाजता ही घटना घडली. दरम्यान, यामुळे पाणीउपसा बंद झाला असून आज (दि.15) शहरात पाणीपुरवठा होणार नसल्याचे मनपाकडून कळविण्यात आले आहे.

पाणी योजनेला एमआयडीसी येथील 132 केव्ही उपकेंद्रावरुन वीजपुरवठा केला जातो. काल सायंकाळी सव्वासात वाजता या उपकेंद्रावर ब्लास्ट झाल्यामुळे पाणीयोजनेचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे. दुरुस्तीच्या कामासाठी सात ते आठ तासांचा अवधी लागणार असल्याने पाणीउपसा बंद राहणार आहे. परिणामी, आज शहरात रोटेशननुसार होणारा पाणीपुरवठा होऊ शकणार नसल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे. दरम्यान, रात्री 9 वाजेपर्यंत महावितरणकडून दुरुस्तीला सुरुवात झाली नव्हती.