Fri, Feb 22, 2019 07:26होमपेज › Ahamadnagar › शहर स्थापना दिनी पक्षी छायाचित्र प्रदर्शन

शहर स्थापना दिनी पक्षी छायाचित्र प्रदर्शन

Published On: May 28 2018 1:47AM | Last Updated: May 27 2018 11:05PMनगर : प्रतिनिधी

निसर्ग मित्र मंडळ आणि अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळाच्या संयुक्‍त विद्यमाने शहराच्या स्थापनादिनानिमित्त ‘वैभवशाली अहमदनगर-पक्षीदर्शन 2018’या पक्षांच्या छायाचित्राचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

शहराचे संस्थापक अहमदशाह यांच्या बागरोजा येथील समाधीस्थळी सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत हे प्रदर्शन राहणार आहे. त्यानंतर सावेडीतील रावसाहेब पटवर्धन स्मारकात सायंकाळी 5 ते 7 यावेळेत हे प्रदर्शन राहणार आहे. 

पक्षीमित्र डॉ. सुधाकर कुर्‍हाडे, सायली कुर्‍हाडे, ऋषिकेश लांडे, संजय दळवी, विद्यासागर पेटकर, ज्ञानेश्‍वर कातकडे, प्रशांत शिंदे आणि कॉ. भैरवनाथ वाकळे यांची छायाचित्र प्रदर्शनात राहणार आहेत. शहर व परिसरात पक्षांचे फोटो राहणार आहेत. हे प्रदर्शन सर्वांना खुले राहणार आहे. या पक्षांची शास्त्रीय नावे आणि वैशिष्ट्ये ही माहिती दिली जाणार आहे. 

आयोजक इंजि. अभिजित वाघ, प्रसाद खटावकर, सुरेश मैड, आसिफखान दुलेखान, सचिन डागा, विलास पाटील, राजेंद्र स्वामी, रोहित वाळके, विजय केदारे, दत्ता वडवणीकर, संजय वाघ आदींनी या प्रदर्शनाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.