Wed, Sep 19, 2018 20:14होमपेज › Ahamadnagar › सावत्र आई-बहिणीकडून मुलाचा खून

सावत्र आई-बहिणीकडून मुलाचा खून

Published On: Apr 27 2018 11:32AM | Last Updated: Apr 27 2018 11:32AMनगर : प्रतिनिधी

कौटुंबिक वादातून सावत्र आई व बहिणीने १६ वर्षीय मुलाचा खून करून मृतदेह  विहिरीत टाकून दिल्याचा संशय व्‍यक्‍त करण्यात येत आहे. राहाता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथे ही घटना घडली.

याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यामध्ये सावत्र आई वैशाली रामेश्वर शिंदे, गायत्री रामेश्वर शिंदे (दोघी रा. रवींद्र खर्डे यांच्या मळ्यात, कोल्हार बुद्रुक, ता. राहाता) या दोघींविरुद्ध संगनमताने खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषिकेश रामेश्वर शिंदे (वय १६) हे मृत मुलाचे नाव आहे. मृताची आई सुनिता रामेश्वर शिंदे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे हे करीत आहेत. कौटुंबिक वादातून खून करून मृतदेह  विहिरीत टाकून देण्यात आला होता, असे म्हटले आहे.