Wed, Jan 16, 2019 16:31होमपेज › Ahamadnagar › लहान मुलास भिकेला लावणार्‍यावर गुन्हा

लहान मुलास भिकेला लावणार्‍यावर गुन्हा

Published On: Jun 21 2018 1:29AM | Last Updated: Jun 20 2018 11:18PMनगर : प्रतिनिधी

चार वर्षाच्या मुलास भीक मागवयास लावल्याबद्दल आरोपी अमोल राजू वैरागर (वय 42) याच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अमोल वैरागर (रा. पाथर्डी) याने चार वर्षाच्या अल्पवयीन मुलाकडून कोठला बसस्थानक भागात भीक मागवून घेत होता. या मुलास वेळोवेळी मारहाण करीत होता. या भागातील जागृत नागरिकांनी ही माहिती चाईल्डलाईनच्या पथकास दिली. चाईल्डलाइनच्या पथकाने तात्काळ कोठला भागात जाऊन अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. 

या चाईल्डलाइनचे पथकातील कर्मचारी अमील अय्युब पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात वैरागर याच्याविरुद्ध भादंवि 317, 323 तसेच बाल न्याय मुलाची काळजी संरक्षण अधिनियम 2015 चे कलम 77 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिस नाईक पठाण पुढील तपास करीत आहेत.