Sun, Jul 21, 2019 02:10होमपेज › Ahamadnagar › ‘त्या’ धनादेशांवर अधिकार्‍यांच्या सह्या

‘त्या’ धनादेशांवर अधिकार्‍यांच्या सह्या

Published On: Jul 04 2018 2:11AM | Last Updated: Jul 04 2018 12:06AMशेवगाव : प्रतिनिधी

बोंडअळी मदतीचे धनादेश केवळ तहसीलदारांच्या सहीअभावी रोकण्यात आले होते. मात्र दैनिक पुढारीने याबाबत वृत्त प्रकाशित करताच जिल्हाधिकार्‍यांनी नायब तहसीलदारांना या धनादेशांवर सह्या करण्याचे आदेश दिल्याने हे रखडलेले धनादेश तत्काळ बँकेत जमा करण्यात येणार आहेत.शेवगाव तालुक्यात पहिल्या टप्प्यात 53 गावांतील 16 हजार 352 शेतकर्‍यांसाठी 8 कोटी 74 लाख 87 हजार 836 रुपयांचे धनादेश वाटपासाठी तयार करण्यात आले होते. मात्र तहसीलदारांची बदली झाल्याने केवळ या धनादेशांवर स्वाक्षरी करण्याची आस्था न दाखवताच त्यांनी आपला पदभार सोडला व येथून काढता पाय घेतला. त्यामुळे ही मदत मिळण्यास विलंब होण्याची शक्यता गृहीत धरुण शेतकर्‍यांत संताप निर्मान झाला होता. याबाबत दैनिक पुढारीने सडेतोड वृत्त प्रसिद्ध केल्याने प्रशासकीय पातळीवर त्याची दखल घेतली व त्याच दिवशी तातडीने सकाळीच जिल्हाधिकार्‍यांनी येथील नायब तहसीलदार पी. एम. गुंजाळ यांच्याकडे पदभार दिला. सही नमुने व इतर बाबींचीही लगेच पूर्तता झाल्यानंतर प्रथम अवघ्या अर्धा तासाच अनुदान धनादेशांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या.

याच दिवशी त्या-त्या गावांतील कामगार तलाठ्यांकडे धनादेश व याद्यांचे वाटप होऊण आज हे धनादेश बँकेत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. आता बँक अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांच्या अडचणी लक्षात घेऊन लवकरात लवकर त्यांच्या बँक खात्यावर ही मदत जमा करण्याची तत्परता दाखविणे गरजेचे आहे. त्याचबरोबर उर्वारित गावांतील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनाही ही मदत तातडीने मिळावी, यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे. दरम्यान, दैनिक पुढारीने या अनुदानाबाबत सतत पाठपुरावा करुन ते शेतकर्‍यांच्या पदरात पाडण्यासाठी प्रयत्न केल्याने शेतकरी पुढारीस धन्यवाद देत आहेत.