Wed, Apr 24, 2019 16:01होमपेज › Ahamadnagar › ‘भोजापूर’संदर्भात गडकरींचे लक्ष वेधले

‘भोजापूर’संदर्भात गडकरींचे लक्ष वेधले

Published On: Jun 18 2018 1:08AM | Last Updated: Jun 17 2018 10:22PMतळेगाव दिघे : वार्ताहर

संगमनेर व सिन्नर तालुक्याला दुष्काळी भागाला वरदान ठरणार्‍या भोजापूर धरणाची उंची तीन मीटरने वाढवावी, या मागणीसाठी सत्याग्रही नेते अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन व डॉ. अभय बंगाळकर यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेतली. भोजापूर धरण उंचीवाढ आंदोलनाच्या वतीने यावेळी ना. गडकरी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

निमोण-तळेगाव भागातील दुष्काळी गावांना पाणी मिळण्यासाठी भोजापूर धरणाची उंची तीन मीटरने वाढवावी, भोजापूर धरण उंचीवाढ आंदोलनाच्या कार्यकर्त्यांकडून या मागणीचा पाठपुरावा सुरू आहे. याप्रश्‍नी कार्यकर्त्यांनी शनिवारी नागपूर येथे केंद्रीय जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत भोजापूर धरणाची उंची तीन मीटरने वाढविण्याची आग्रही मागणी केली. मुख्य कालव्याची वहनक्षमता 300 क्यूसेक करावी, तसेच तळेगाव भागातील भोजापूर पूरचारीची दुरुस्ती करावी, याकडे लक्ष वेधले. या प्रसंगी अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, डॉ. अभय बंगाळकर उपस्थित होते. यावेळी ना. गडकरी यांना ‘भारताचे सिंचन पुरुष’ अशी उपाधी दिल्याचे सत्याग्रही नेते अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी सांगितले.