Thu, Jun 20, 2019 01:11होमपेज › Ahamadnagar › दिवसा घरफोडी करणारे दोघे जेरबंद

दिवसा घरफोडी करणारे दोघे जेरबंद

Published On: Jan 08 2018 1:12AM | Last Updated: Jan 07 2018 11:20PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

एमआयडीसी परिसरात दिवसा घरफोडी करणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने काल (दि. 7) साईबन रस्त्यावर पकडले. त्यांनी घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. 

अटक केलेल्यांमध्ये विठ्ठल महादेव गिते (वय 19, रा. माळीवाडा, नगर), अनिल चंद्रकांत शिंदे (वय 22, रा. शिवम प्लाझा टॉकीजजवळ, माळीवाडा) यांचा समावेश आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक श्रीधर गुठ्ठे, कर्मचारी भाऊसाहेब काळे, मन्सूर सय्यद, सुनील चव्हाण, संदीप पवार आदींच्या पथकाने ही कारवाई केली. या चोरट्यांनी आणखी काही चोर्‍या उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यांना पुढील चौकशीसाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.