Thu, May 23, 2019 04:52होमपेज › Ahamadnagar › राजकीय वादातूनच दोघांची हत्या!

राजकीय वादातूनच दोघांची हत्या!

Published On: Apr 10 2018 1:17AM | Last Updated: Apr 10 2018 12:34AMनगर : प्रतिनिधी

शिवसैनिकांची झालेली हत्या ही घरगुती वादातून नव्हे, तर राजकीय वादातूनच झाली आहे. त्यांचे कुटुंबीय आजही दहशतीखाली आहेत. त्यांना संरक्षण द्यायला हवे, असे सांगत निवडणूक काळातील दहशतीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. शिवसेना नगरसेवक योगीराज गाडे यांना सुवर्णा कोतकर यांच्या ‘पीए’नी रात्री दीड वाजता फोन करुन धमकावले होते. त्यांच्या मोबाईलवर नोंदी असल्याचा दावा शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केला आहे.

‘राष्ट्रवादी’च्या पत्रकार परिषदेनंतर राठोड यांनी पत्रकार परिषद घेवून पुन्हा निशाना साधला. मतदानाच्या दिवशी आमदारांकडून मतदान केंद्रावर सुरु असलेल्या दहशतीबाबत पोलिसांना कळविले होते. निवडणूक काळातही पैसे वाटप, दहशत याबाबत आयोगाकडे, पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. मतदान केंद्रावर नगरसेवकाला शिवीगाळ करण्यात आली. या सर्व प्रकारांकडे सहाय्यक पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी दुर्लक्षच केले, असे ते म्हणाले. कर्डिले, कोतकर, जगताप हे काय साधू संत आहेत का? असा सवाल करून त्यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेतच, खूनाची फिर्याद मयत कोतकर यांच्या मुलाने दिली आहे.

कोतकर यांनी प्राण सोडण्यापूर्वी मुलाला फोन करुन यांची नावे सांगितली आहेत. 36 सेकंद ते बोलले. बोलत असताना त्यांचा गळा चिरण्यात आला. ही नावे काही मी दिलेली नाहीत. ‘राष्ट्रवादी’चे नेते काहीही बोलत असतील. मात्र, हे सत्यच आहे. शिवसेनेवर कारवाईचा इशारा देत असतील तर हा सुद्धा दहशतीचाच प्रकार समजायचा का? असा सवाल करुन ज्यांची हत्या झालीय त्यांना न्याय देण्याची भूमिका आमची आहे. त्यासाठी आम्हीच चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच त्यांच्या पक्षाला बदनाम करत आहेत. ‘राष्ट्रवादी’ आधीपासूनच बदनाम आहे, आम्ही काय बदनामी करणार, असा टोलाही राठोड यांनी लगावला आहे.

आत्महत्या प्रकरणातील नावे समोर आणा!

उद्योजक बाळासाहेब पवार यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीतील नावे समोर यायला हवीत. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासून कोण-कोण दमदाटीसाठी आले होते, याची चौकशी करावी. चिठ्ठीत कोणत्या सावकारांची नावे आहेत, त्यांचा कुणा-कुणाशी संबंध आहे, हे पुढे आले पाहिजे. या सर्वार्ंंचा संबंधही कोतकर, कर्डिले, जगताप यांच्याशी जोडला जाईल, असा दावाही अनिल राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.

 

Ahmednagar, Ahmednagar news, Shivतainik murder case, political debate, Anil Rathod,