Thu, Mar 21, 2019 23:52
    ब्रेकिंग    



होमपेज › Ahamadnagar › मोदीजी..शहाजी.. आता तुम्हीच बघा बुवा आमच्या नगरचं काय ते..! 

ब्लॉग : ‘इनका साथ, तो पद खल्लास, उनका दिया तो करियर भकास..’

Published On: Dec 24 2017 12:39PM | Last Updated: Dec 24 2017 12:56PM

बुकमार्क करा





अनिरूद्ध देवचक्के

दोन नेत्यांमधला संघर्ष   हे, पक्षात लोकशाही जीवंत असल्याचं लक्षण आहे’, असं भाजपाच्या आत्तापर्यंतच्या किमान पाच प्रदेशाध्यक्षांकडून ऐकत ऐकत नगर जिल्ह्यातली एक पिढी परिपक्व होत  आता वृध्दापकाळाकडे झुकत चाललीआहे. दुसरी पिढी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या अत्यंत प्रभावी कार्यशैलीकडेआकर्षित होऊन भाजपाशी जुळण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु तरी देखील भाजपातील ही  तथाकथित जीवंत  लोकशाही नगरकरांच्या पचनी पडायला काही तयार नाही. केंद्रीयमंत्रीपद भूषविलेले खासदार दिलीप  गांधी आणि पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी अ‍ॅड. अभय आगरकर यांच्या दोन  गटातील सध्या ऐरणीला पोहोचलेला  संघर्ष पाहता भाजपातील लोकशाहीची एकतर लक्तरे झाली असावीत किंवा या दोन्ही नेत्यांमधलं ‘चॉकलेटी भांडणाचं’ बालपण अजुनही संपलेलं नाही, असंच म्हणावं लागेल.  चॉकलेटसाठी हट्ट धरणार्‍या बालकाला, आपली  स्वत:ची चॉकलेटची फॅक्टरी आहे, अशी स्वप्न पडत असतात. थोडसं वय वाढल्यावर ते स्वप्न किती फोल  आहे, हे त्याला आपसुकच समजून जातं. इथे मात्र अख्खी फॅक्टरी आणि बंगला चॉकलेटचा झाल्यावरही मोह सुटत नाही, याला काय म्हणावं बरं..!

‘नगरी बालपण..?’ गुजरातच्या निवडणुकीत शतक  गाठताना भाजपाची चांगलीच दमछाक झाली असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा देशात अजूनही टिकून आहे. त्याचा फायदा संघटना  वाढीसाठी करून घेण्याऐवजी पक्षाची  गटातटात विभागणी करून मोदींच्या ध्येय्य धोरणांच्या चिंधड्या उडविण्याचे काम सध्या शहर भाजपात सुरू आहे. मोदी म्हणतात, ‘सबका साथ.. सबका विकास’ आणि नगरात मात्र ‘इनका साथ दिया तो पद खल्लास, उनका साथ दिया तो करियर भकास..’  त्यामुळे राज्यात आणि केंद्रात भाजपा सत्तेत असूनही शहरात आणि  जिल्ह्यातही  घटनात्मक पातळीवर कोणत्याही प्रकारची मजबुती पक्षाला मिळविता आलेली नाही, हेच आजचं वास्तव आहे. आज मोदींसाठी भाजपात येण्याची तयारी दर्शविणारे,इतर पक्षातील अनेक पदाधिकारी,  नगरसेवक, कार्यकर्ते आणि काही युवक व सामान्य कार्यकर्ते केवळ या  एकाच प्रश्‍नासाठी बिचकून आहेत की, ‘या’ गटाचा शिक्का बसला आणि पुढे तिकिट नाही मिळालं तर, आणि ‘त्या’ गटाचा शिक्का  बसून मिळालेले तिकिट या गटाने कापलं तर काय घ्या..? त्यापेक्षा चार हात दूर राहिलेलं बरं. परिणामी भाजपात नेमकं कसं काम करायचं आणि पक्ष कसा वाढवायचा असाच प्रश्‍न बहुतांश मंडलाध्यक्षांना पडलेला आहे.

हाच प्रश्‍न पक्षाच्या  आत्तापर्यंतच्या अनेक प्रदेशाध्यक्षांनाही भेडसावतो आहे आणि आता तो  रावसाहेब दानवे यांच्या पारड्यातयेऊन पडलेला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  पक्षाचे  राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांचा सत्काराचा मोठा समारंभ नगरात आयोजित करण्यात आला होता. त्याही वेळेला हाच आणि याच नेत्यांमधला  वाद पुढे आलेला होता. लवकरच हा वाद मिटेल आणि पक्ष  कत्रितपणे पुढे काम करेल, असे गडकरी यांनी  त्यावेळी सांगितले होते. तेंव्हा तर भाजपा सत्तेतही नव्हता. पांडुरंग फुंडकर, प्रा. ना. स. फरांदे, गोपिनाथ मुंडे, प्रमोद  महाजन यांच्या सारख्या तगड्या  त्यांनीही नगरपुढे हात टेकल्याची उदाहरणे आहेत.

 संघटन मंत्री म्हणून  काम पाहताना डॉ.राजेंद्र फडके आणि सुहास  फरांदे यांचाही याच वादामुळे ‘भेजा फ्राय’ झालेला. पक्षाचे  काही निरिक्षक वाद  मिटवायला आले आणि स्वत:च वादात अडकले. इतके की त्यांच्याच तक्रारी  थेट राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंत गेल्या. त्यामुळे आता नगरचा भाजपा म्हटलं  की दिल्ली, मुंबईत कानाला खडा लावतात म्हणे..!  मध्यंतरी गोपिनाथ मुंडेंच्या सल्ल्याने अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांना भाजपाचं जिल्हाध्यक्ष केल्यानंतर निदान ते तरी (मुळचे भाजपाचे ‘इनका साथ, तो पद खल्लास, उनका दिया तो करियर भकास..’  

आला  ही. खा. गांधी यांनी नव्याने नियुक्त केलेल्यांना ताकद व बळ देण्याचे काम सुरूच ठेवले. त्यामुळे मग आगरकर गटाने पुन्हा दानवेंना  पत्र पाठवून आश्‍वासनांची आठवण करून दिली आणि खा.  लीप गांधी यांच्यावर पक्ष शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. शिवसेनाभाजपाच्या  अखत्यारित असलेल्या महानगरपालिकेतही या दोन गटांचा असाच महाघोळ सुरू आहे. भाजपाचे गटनेते  म्हणून तेथे  नगरसेवक दत्तात्रय कावरे होते. अचानक नगरसेवक सुवेंद्र गांधी गटनेते झाले. आता कोणत्या गट नेत्याचं ऐकायचं  असा ‘मूलभूत’ प्रश्‍न भाजपाच्या नगरसेवकांना पडला आहे. त्याचा परिणाम असा झाला की ‘मूलभूत’ प्रकरणातले ‘अमृत’ प्राशन करून शिवसेनेचेच पदाधिकारी राजकारणात ‘अमर’ होत चालले आहेत आणि  भाजपावाले आपला गटनेता कोण? या प्रश्‍नाभोवती  रगर फिरत आहेत. या  सगळ्या सावळ्या गोंधळामुळे भाजपात येण्यासाठी इच्छुक असलेले काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नगरसेवक  सध्या तरी ‘थांबा.. पहा आणि जा..’ या भूमिकेत आहेत. नाही  री ते करणार  काय? भाजपात जायचं तर खरं.. पण कोणाच्या? खा. गांधीच्या? की अ‍ॅड. आगरकरांच्या? असा भलामोठा प्रश्‍न  त्यांच्या पुढ्यात आहे.

भाजपा मोदी आणि अमित शहांचा आहे (निदान सध्यातरी) हेच सगळे विसरलेले  आहेत. त्यामुळे मोदींकडे पाहून पक्षात येण्याच्या प्रक्रियेला इथे पुरती खीळ बसलेली पहायला मिळतेय, याची कोणाला खंतही नाही आणि दु:खही नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याच्या आधी एका मुलाखतीत लालकृष्ण अडवाणी यांच्या मुद्यावररून विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना  म्हणाले होते की, मै आज इस स्थानपर हूँ, क्योंकी अडवाणीजी और अन्यवरिष्ठ   तांओंने मुझे अपने कंधे पेबिठाया है। उनके आशिर्वादसेही मै यहां हूँ।’ हा मोदींनी दाखविलेला  मनाचा मोठेपणा नगरमध्ये का दिसू दिला जात नाही, हाच खरा प्रश्‍न आहे. खरंतर मोठमोठी पदं भूषविल्यानंतर शहर जिल्हाध्यक्षपदावर काम पाहणं हे खा. गांधी यांना शोभेसे नाही. सुवेंद्रच्या राजकीय करियरचा प्रश्‍न असला तरी गेल्या काही दिवसात त्याने स्वत: स्वत:चे वर्तुळ निर्माण केलेले आहेच. त्याला स्वतंत्रपणे त्याची राजकीय कारकिर्द घडवू द्यावी. राजकारणातले टक्के टोणपे खाऊ द्यावेत. सतत त्याच्या भोवती आपल्या खासदारकीचे सुरक्षा कवच गुंडाळून त्याला आपण  जखडून टाकतो आहोत, हे त्यांच्या लक्षात का येत नाही? या संदर्भात आमदार संग्राम जगताप यांचे उदाहरण डोळ्यांसमोर आहे. आज अरूणकाका जगताप आणि संग्राम जगताप यांचे राजकीय वर्तुळ स्वतंत्र आहे. संग्राम जगताप यांनी स्वत:च्या कार्यकर्त्यांची टीम उभी केली आहे. अनेक उपनगरांमध्ये त्यांचे कार्यकर्ते पहायला मिळतात. त्यांनी जसं आपलं स्वतंत्र राजकीय व्यक्तिमत्व विकसीत केलं तसं सुवेंद्र गांधी यांचंही होऊ शकत होतं. परंतु खा. गांधीच्या अतिप्रेमामुळे कदाचित त्यांच्यावरही मर्यादा आलेल्या असण्याची शक्यता आहे.

अजूनही वेळ गेलेली नाही. आता सुवेंद्र यांनीच पुढाकार  घेऊन शहरातील राजकारणात स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. गट-तट बाजूला सारून भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधावा. कोणी कोणत्याही गटाचे का असेना  आपला प्रयत्न  सर्वांना भाजपाचे करण्याचा आहे, हे सर्वांच्या नावर बिंबवावे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आगरकर आणि आपले वडील यांच्यातील बिनबुडाचा संघर्ष एकदाचा मिटवून  टाकावा..! (सुवेंद्र  गांधी जर हे करू शकले तर ते देश पातळीवरील  सर्वोच्च नेत्यांच्या पंगतीत जाऊन बसतील. कारण जे प्रत्यक्ष नरेंद्र आणि देवेंद्रांनाही शक्य नाही, ते सुवेंद्र यांनी करून दाखवलं, असा त्याचा अर्थ निघेल.) भारतीय जनता पक्ष म्हणजे नगर अर्बन बँक नाही. बँकेत जसा  चेअरमनचा शब्द अंतिम असतो, तसं पक्षात होऊ शकत नाही. त्यामुळे आता जरी नवे मंडलाध्यक्ष नियुक्त केले तरी ते कायम आपल्याच  गटाला बांधिल राहतील, आणि सतत ‘मोठ्या घरी’ किंवा ‘मळ्यात’ येऊन आपल्या गट बांधिलकीचे पुरावे देत राहतील, असं गांधी असोत किंवा आगरकर यांनी मानण्याचं काहीच कारण नाही.

डॉ. सुजय विखे भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष?

जो पर्यंत खा. दिलीप गांधी आणि अ‍ॅड. अभय आगरकर आपापल्या गटातल्या कार्यकर्त्यांकडे ‘भाजपा कार्यकर्ता’ म्हणून पहात नाहीत, तो पर्यंत शहरातला हा वाद काही मिटणे नाही. घरात भांडणं असली, तरी परकीय  आक्रमणाच्यावेळी भाऊबंधच  मदतीला येतात, हेही लक्षात ठेवायला हवं. कारण, भविष्यात डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील भाजपात येऊन दक्षिणेचे खासदार झाले आणि नंतर तेच भाजपा जिल्हाध्यक्ष वा शहर जिल्हाध्यक्ष होऊन बसले तर.. कसं व्हायचं या ‘नगरी बालपण’ जपणार्‍या नेत्यांचं? मोदीजी..शहाजी.. आता तुम्हीच बघा बुवा आमच्या नगरचं काय ते..!