Mon, Jun 24, 2019 16:40होमपेज › Ahamadnagar › बायोमेट्रिकमुळे बाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण घटले

बायोमेट्रिकमुळे बाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण घटले

Published On: Jul 02 2018 1:41AM | Last Updated: Jul 01 2018 10:21PMपाथर्डी : सुभाष केकाण

राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद घेण्यासाठी बोयोमेट्रिक हजेरी सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने पाथर्डी तालुक्यात परजिल्ह्यातून येणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. स्थानिक विद्यार्थ्यांनी देखील लातूर, औरंगाबाद, नगर येथील कोचिंग क्लासेसचे प्रवेश रद्द करून कनिष्ठ महाविद्यालयात नियमित उपस्थितीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता कनिष्ठ महाविद्यालयातील शैक्षणिक दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे. 

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील विशेषत:विज्ञान शाखेतील विद्यार्थी नियमित वर्गांना उपस्थित न राहता अन्य शहरात अगर स्थानिक ठिकाणी असलेल्या कोचिंग क्लासेसला उपस्थित रहात असत. काही शाळांनी खासगी क्लासेस बरोबर सामजंस्य करार केल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. पुणे विभागात जास्तीच्या मेडीकल कॉलेजच्या जागा असल्याने मराठवाड्यातील विद्यार्थी लातूर, औरंगाबाद येथे खासगी शिकवणी वर्गाला जावून पाथर्डीत प्रवेश घेत असत. तर येथे कॉपी होते म्हणून मुंबई, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग येथील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात दहावी, बारावीसाठी प्रवेश घेत असत. त्यातूनच पाथर्डीमध्ये अकरावी, बारावीकरीता मोठी विद्यार्थी संख्या असे. मात्र, राज्य सरकारने या प्रक्रियेला चाप बसण्यासाठी राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक व औरंगाबाद या पाच विभागात कनिष्ठ महाविद्यालयासाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रीक पद्धतीने घेण्याचे आदेश दिल्याने पाथर्डीला प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. 

पाथर्डी तालुक्यात कनिष्ठ महाविद्यालयाची संख्या मोठी आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून अभियांत्रिकी, मेडिकल,अ‍ॅग्री,फार्मसी हे प्रवेश नीट, जेईई, सीईटी या परीक्षेच्या माध्यमातून सुरू झाल्याने या परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी विद्यार्थी मोठी फी भरून लातूर, औरंगाबाद, पुणे, नगर येथे जात असत. विद्यार्थी फक्त परीक्षेसाठीच शाळेत येत असत. त्यामुळे विद्यार्थी नसतांना अनुदानित महाविद्यालयातील शिक्षकांच्या वेतनावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असे. विद्यार्थी बाहेर खासगी शिकवणी वर्ग करत असल्याने अनुदानित,विना अनुदानित शाळामधील शैक्षणिक दर्जा सुमार घसरला होता. त्यामुळे आर्थिक सर्रासपणे विद्याथ्यार्ंंना खासगी शिकवणी वर्गाला प्रवेश घ्यावा लागत असे. शासनाच्या या निर्णयाने मात्र आता कनिष्ठ महाविद्यालयात नियमितपणे विद्यार्थी उपस्थित राहून नियमित क्लास होतील, अशी अपेक्षा वाढली आहे.