Tue, Nov 20, 2018 13:08होमपेज › Ahamadnagar › मोकळ्या भूखंडावर अनधिकृत गाळे

मोकळ्या भूखंडावर अनधिकृत गाळे

Published On: Mar 25 2018 1:44AM | Last Updated: Mar 24 2018 11:09PMनगर : प्रतिनिधी

नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोकळ्या जागांवर अनधिकृतपणे गाळे उभारून लाखो रुपयांना विकली आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहेत. तसेच कर्मचार्‍यांचा सहावा वेतन आयोगाची  रक्कम हडपली असल्याचा गंभीर आरोप महाआघाडीचे नेते माजी खासदार दादापाटील शेळके व  शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. शशिकांत गाडे यांनी पत्रकार परिषदेत केला. 

याप्रसंगी पंचायत समिती सभापती रामदास भोर, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, प्रताप पाटील शेळके, बाळासाहेब हराळ, संपत म्हस्के, प्रविण कोकाटे, नगरसेवक योगीराज गाडे, अशोक भगत, बाबासाहेब गुंजाळ, संदीप गुंड, राजू भगत आदी उपस्थित होते. 

प्रा. गाडे म्हणाले, बाजार समितीच्या आवारातील आरक्षित जागा बेकायदेशीरपणे हस्तांतरीत करून मनपाची कोठलीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. तसेच बाजार समितीचा कारभार बेकायदेशीरपणे सुरू आहे. अनाधिकृत बांधकामांवर आळा घालून विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करावेत. अनधिकृत बांधकामांवर आठ दिवसांत कारवाई न झाल्यास नगर तालुका शेतकरी महाआघाडी व शेतकर्‍यांच्या वतीने कार्यालयात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा उपनिबंधक यांना दिला आहे. तसेच न्यायालयातही दाद मागण्याचा इशारा दिला आहे.

Tags : ahmadnagar, Billion scam, market committee,