Mon, May 27, 2019 08:42होमपेज › Ahamadnagar › बिडवेंच्या फिर्यादीवरून छिंदमविरुद्ध गुन्हा दाखल

बिडवेंच्या फिर्यादीवरून छिंदमविरुद्ध गुन्हा दाखल

Published On: Feb 18 2018 1:54AM | Last Updated: Feb 17 2018 11:17PMनगर : प्रतिनिधी

उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्याविरुद्ध बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारी कामात अडथळा आणून धार्मिक भावना दुखाविल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. 16) रात्री उशिरा हा गुन्हा नोंदविण्यात आला.

बिडवे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, छिंदम याने त्याच्या मोबाईलवरून बिडवे यांच्या मोबाईलवर फोन केला. त्याने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अश्‍लील शब्द वापरून धार्मिक भावना दुखाविल्या. तसेच बिडवे हे शासकीय काम करीत असताना अडथळा आणून शिवीगाळ करून धमकी दिली. याप्रकरणी छिंदम याच्यासह उपमहापौर पीए चिप्पा, राशीनकर (पूर्ण नाव माहीत नाही) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजयकुमार सोने हे करीत आहेत.