Wed, Sep 26, 2018 20:23होमपेज › Ahamadnagar › कोल्हेंनी केला भुजबळांचा सत्कार

कोल्हेंनी केला भुजबळांचा सत्कार

Published On: Jun 17 2018 1:34AM | Last Updated: Jun 16 2018 11:34PMकोपरगाव : प्रतिनिधी

येथील भारतीय जनता पक्षाच्या आ. स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगनराव भुजबळ यांचा नुकताच कोपरगाव येथे सत्कार केला. संजीवनी उद्योग समुहालगत असलेल्या धोंडीबानगरातील साईधाम मंदिराच्या 19 व्या वर्धापनदिनास छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ यांनी भेट दिली. त्याप्रसंगी हा सत्कार करण्यात आल.  त्यामुळे अनेकांच्या भुवया याप्रसंगी उंचावल्या होत्या.

साईधाम मंदिराचा शनिवारी 19 वा वर्धापनदिन होता. त्यानिमित्त येथे देश-विदेशातील साईभक्त दर्शनासाठी जमले होते. अचानकपणे भुजबळ यांनी देखील या स्थानास भेट देऊन साईंचे दर्शन घेतले. त्याप्रसंगी स्नेहलता कोल्हे यांनी संजीवनी उद्योग समूह व कोल्हे परिवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष नितीनराव कोल्हे, संगणक तज्ज्ञ विजय नायडू, भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद थोरात, संजीवनी कारखान्याचे उपाध्यक्ष सोपानराव पानगव्हाणे, साईधामचे सुरेश चव्हाण उपस्थित होते.  

सत्कारास उत्तर देताना भुजबळ म्हणाले की, सबका मालिक साईबाबांचा आर्शिवाद आणि तमाम जनतेच्या सदिच्छांमुळे आपण वाईट काळातून बाहेर आलो. इतर मागासवर्गीयांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी याही वयात लढाई सुरू आहे ती अशीच पुढे चालू ठेवणार आहे.