Wed, Apr 24, 2019 07:32होमपेज › Ahamadnagar › भिडे गुरुजींचा वारकर्‍यांकडून निषेध : तनपुरे महाराज

भिडे गुरुजींचा वारकर्‍यांकडून निषेध : तनपुरे महाराज

Published On: Jul 16 2018 1:25AM | Last Updated: Jul 15 2018 11:47PMकरंजी : वार्ताहर 

जगाला अध्यात्म आणि परमार्थाचा संदेश देणारे जगद‍्गुरू श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा मनू संस्कृती श्रेष्ठ, असल्याचे विधान करणार्‍या भिडे गुरुजींचा वारकरी संप्रदायाकडून जाहीर निषेध व्यक्त करत असल्याचे बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी म्हटले. 

मागील दहा वर्षांपासून पाथर्डी तालुक्यातील वैजूबाभूळगाव येथून निघत असलेल्या राष्ट्रसंत तनपुरे बाबा पायी दिंडीचे श्रीक्षेत्र दगडवाडी येथे आगमन झाल्यानंतर या दिंडीचे बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी स्वागत केले. यावेळी महादेव महाराज वांढेकर, कारभारी महाराज जरे, जि. प. सदस्य अनिल कराळे, शिवसेना तालुकाप्रमुख रफीक शेख, सत्यभामा तनपुरे, शेतकरी संघटनेचे साईनाथ घोरपडे, सरपंच अरुण शिंदे, महेश अंगारखे, उपसरपंच साहेबराव शिंदे, माजी सरपंच बापूसाहेब शिंदे, राजेंद्र पाचे, प्रा. परशुराम घोरपडे आदी उपस्थित होते. प्रकाश शिंदे यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला. 

यावेळी तनपुरे महाराज म्हणाले, ज्यांच्या शिकवणीवर आज संपूर्ण जग मार्गक्रमन करत आहे. त्यांचं श्रेष्ठत्व कमी करण्याचा यांना कोणी अधिकार दिला. अशा प्रवृत्तींचा तुकोबा-ज्ञानोबांचे पाईक म्हणून आम्ही वारकरी संप्रदायाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो. देता आले तर समाजाला चांगले द्या. काहीही व्यक्तव्य करून समाजाची दिशाभूल करण्याचे काम कोणीही करू नये, अशा शब्दांत तनपुरे महाराज यांनी भिडे गुरुजींच्या वक्तव्याचा समाचार घेतला.