Sun, May 26, 2019 17:19होमपेज › Ahamadnagar › नगर- केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरण : फरार भानुदास कोतकरला अटक

नगर- केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरण : फरार भानुदास कोतकरला अटक

Published On: May 14 2018 10:02AM | Last Updated: May 14 2018 9:59AMनगर: पुढारी ऑनलाईन

केडगाव दुहेरी हत्याकांडात फरार असलेल्या भानुदास कोतकरला स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली. येरवडा पोलिस ठाण्यात हजेरीसाठी आलेले असताना पोलिसांनी त्याला पकडले. लांडे खून प्रकरणात जन्मठेपेच्या शिक्षेत कोतकरला जामीन मिळाला असून हजेरीसाठी तो आज सकाळी येरवडा पोलिस ठाण्यात आला होता. तेथे पोलिसांनी केडगाव येथील दुहेरी हत्याकांडात ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

नगर- केडगाव दुहेरी हत्याकांडातील मृत संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या कुटुंबीयांनी शनिवारपासून उपोषणाला बसले आहेत. पोलिसांचा तपास योग्य पध्दतीने होत नसल्याचा आरोप दोन्ही कुटुंबांनी केला होता. फरार आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले होते.