Sat, Jul 20, 2019 08:42होमपेज › Ahamadnagar › भंडारदरा धरण ९० टक्के भरले 

भंडारदरा धरण ९० टक्के भरले 

Published On: Jul 22 2018 1:03AM | Last Updated: Jul 22 2018 12:23AMअकोले/ राहुरी : प्रतिनिधी

धरण पाणलोटात पावसाची संततधार सुरू असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. भंडारदरा धरणात काल सायंकाळी 9500 दलघफू पाणीसाठा झाल्याने स्पील वे, कॅनाल, व्हॉल्वमधून 6311 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. हे पाणी प्रवरा पात्रातून निळवंडेत जमा होत असल्याने निळवंडेचा साठा 3231 दलघफू झाला आहे. मुळा धरणातही 8373 क्युसेकने आवक सुरू असल्याने हे धरण काल निम्मे भरले होते.

भंडारदरा धरणात 9100 दलघफू  पाणीपातळी कायम ठेवून सकाळी 11.30 वा. 6311 क्युसेकने पाणी सोडले. हे पाणी निळवंडेत जात असून वाकीचा 2119 क्युसेक ओव्हरफ्लोही निळवंडेकडे झेपावला आहे. रात्री उशिराने भंडारदर्‍याचा पाणीसाठा 9500 दलघफूच्या पुढे ढकलला होता.  

मुळा धरणाने 13 हजार दलघफू क्षमतेचा टप्पा ओलांडला आहे.  धरणाकडे 8373 क्युसेक प्रवाहाने नवीन पाणी जमा होत आहे.  मागील वर्षी मुळा धरण 22 जुलै रोजीच धरण निम्मे भरले होते. त्याचीच पुनरावृत्ती यंदाही झाली आहे.  धरणात पाण्याची आवक होत असताना लाभक्षेत्रात मात्र पावसाने पाठ फिरविली आहे.