Wed, May 22, 2019 22:19होमपेज › Ahamadnagar › बेलपिंपळगाव शाळा पेटविण्याचा प्रयत्न

बेलपिंपळगाव शाळा पेटविण्याचा प्रयत्न

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेलपिंपळगाव : वार्ताहर

बेलपिंपळगाव (ता. नेवासा) येथील प्राथमिक शाळेस माथेफिरुकडून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. महावीर जयंती, गुड फ्रायडेची दोन ते तीन दिवस शाळेला सुट्टी असल्याने सायंकाळी 6 च्या सुमारास शाळेतील मागील बाजूला असणार्‍या खिडकीवर रॉकेल ओतून पेटवण्यात आले होते. त्यामुळे खिडकीने पेट घेतल्याने हा जाळ दिसल्याने परिसरातील तरुणांनी पळापळ करून ही आग विझविली. तरुणांच्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळली.

शाळेला सुट्टी असल्याने या भागात कोणी नाही, याचा मोका साधून  शाळा पेटविण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी झाले नाही, जर वर्गाने पेट घेतला असता, तर मोठे शाळेचे नुकसान झाले असते. 

सकाळी हे वृत्त कळताच शाळेतील काही शिक्षक, पोलिस पाटील संजय साठे, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे,  चंद्रशेखर गटकळ, बापूसाहेब औटी, भीमराज सुरसे, कल्याण शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी केली. असे कृत्य करणार्‍या  दोषींवर कारवाईची मागणी पालक व ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.  या घटनेची परिसरात चर्चा सुरू आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार
बेलपिंपळगाव हे गाव शांत गाव आहे. हा प्रकार गावात प्रथमच घडला असून यात दोषी असणार्‍याला कोणी पाठीशी घालणार नाही. घडलेली घटना वाईट असून शाळेला लवकरात लवकर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे अशी अपेक्षा आहे. शिक्षण घेण्याच्या ठिकाणी असे प्रकार घडतात हे वाईट आहे.    - बाळासाहेब शिंदे, अध्यक्ष तंटामुक्ती बेलपिंपळगाव

 

Tags : Ahmednagar,  Ahmednagar news, Belpipalgaon, school, fire,


  •