Tue, Apr 23, 2019 10:23होमपेज › Ahamadnagar › इंदापूर तालुक्यात आढळले दुर्मिळ फुलपाखरू

इंदापूरमध्ये आढळले दुर्मिळ फुलपाखरू

Published On: Sep 04 2018 11:37PM | Last Updated: Sep 05 2018 8:32AMबावडा : वार्ताहर

शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील निरा-भीमा सहकारी साखर कारखान्यावरती अतिशय दुर्मिळ समजले जाणारे ‘अ‍ॅटलस’ जातीचे फुलपाखरू मंगळवारी (दि. 4) आढळून आले. 
हे फुलपाखरू  पतंग प्रवर्गातील असून अतिशय सुंदर व देखणे फुलपाखरू म्हणून त्याची जगात ओळख आहे. या फुलपाखराच्या पंखांचा व्यास तब्बल 16 सें.मी.एवढा मोठा आहे. 
फुलपाखराची अ‍ॅटलस ही जात जगातून नष्ट होत चालली असून महाराष्ट्रात हे फुलपाखरू भीमाशंकरच्या जंगलात आढळून आल्याचे सांगितले जाते. यापूर्वीही अशा अनेक प्रजाती भीमाशंकरच्या जंगलामध्ये निदर्शनास आल्या आहेत.