होमपेज › Ahamadnagar › मनपा कर्मचारी बाळू भाकरे यांनी केली होती आत्महत्या

'त्या' आत्महत्येप्रकरणी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा!

Published On: May 04 2018 1:08PM | Last Updated: May 04 2018 1:07PMअहमदनगर : पुढारी ऑनलाईन

मनपा कर्मचारी बाळू भाकरे यांच्या आत्महत्येप्रकरणी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनपा कर्मचारी युनियनने केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल द्विदेदी यांना निवेदन देण्यात आले असून आरोपींना अटक होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा कॉम्रेड अनंत लोखंडे यांनी दिला. युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी मयत भाकरे यांना श्रध्दांजली  वाहिली. 

कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्यावर  सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे मनपा प्रशासनाने पत्र दिले आहे. याचा कर्मचारी युनियनकडून निषेध करण्यात आला.