Tue, Jul 16, 2019 10:11होमपेज › Ahamadnagar › डोक्यात हवा गेल्यामुळे ‘मनसे’ची झाली वाताहत

डोक्यात हवा गेल्यामुळे ‘मनसे’ची झाली वाताहत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

पक्षाची स्थापना झाल्यानंतर पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेला मोठे यश मिळाले. 14 जागा मिळाल्यानंतर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात ‘हवा’ गेली. त्यामुळेच नंतरच्या काळात पक्षाची वाताहत झाल्याची स्पष्ट कबुली मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी नगरमध्ये बोलताना दिली. दरम्यान, शेतकरी व ग्रामीण भागातील प्रश्‍नांकडेही मनसेचे दुर्लक्ष झाल्याचे मान्य करत, या सर्व बाबींबाबत सुधारणा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे 20 एप्रिलपासून राज्यभरात दौरा करणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर स्थानिक पातळीवरील पक्षाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नांदगावकर काल (दि.30) नगरमध्ये आले होते. शासकीय विश्रामगृहावर कार्यकर्त्यांची बैठक झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नांदगावकर म्हणाले की, मनसेच्या स्थापनेनंतर पक्षाचा आलेख लगेच वाढल्याने आमच्या डोक्यात ‘हवा’ गेली आणि त्यामुळे पक्षाचे नुकसान झाले. लोकांच्या विश्वासाला पात्र न ठरल्यानेच आमचा आलेख नंतरच्या काळात ढासळला. हळूहळू यश मिळालं असतं तर बरं झालं असतं, असे ते म्हणाले. 

राज्यातील सध्याच्या राजकारणाबाबत बोलताना ते म्हणाले की,  सध्या तरी आमची ‘एकला चलो’ची भूमिका आहे. भविष्यात काय होईल, हे सांगता येत नाही. राज ठाकरे व शरद पवार यांच्यातील वाढत्या जवळीकीकडे लक्ष वेधले असता, याचा त्यांनी इन्कार केला. मात्र, त्या दोघांच्या मनात काय आहे, हे मी सांगू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज ठाकरेंनी नाशिकचा जो विकास केला, तो मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेऊनही केला नाही. उलट आमची कामं बंद पाडली. मुख्यमंत्री राज्याचा प्रमुख असताना एखादं शहर दत्तक कसं घेऊ शकतात? असा सवाल करीत नांदगावकर यांनी मुख्यंमत्र्यांवरही निशाणा साधला.

 

Tags : Ahmednagar,  Ahmednagar news, MNS, Bala Nandgaonkar, 


  •