Sat, Aug 24, 2019 21:12होमपेज › Ahamadnagar › आ. शिवाजी कर्डिलेंसह पाच जणांना जामीन

आ. शिवाजी कर्डिलेंसह पाच जणांना जामीन

Published On: Apr 25 2018 12:55AM | Last Updated: Apr 24 2018 11:28PMनगर : प्रतिनिधी

पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला प्रकरणातील आरोपी भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले व इतर चौघांना काल (दि. 24) जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दर रविवारी पोलिस ठाण्यात हजेरीची अट व प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या वैयक्‍तिक जाचमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

आ. शिवाजी कर्डिले, अ‍ॅड. प्रसन्न जोशी, अ‍ॅड. संजय वाल्हेकर, सागर वाव्हळ, अलका मुंदडा या पाचजणांनी जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता. त्या अर्जावर सोमवारी (दि.23) अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश भिलारे यांच्यासमोर सुनावणी झाली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने मंगळवारी (दि. 24) निर्णय देणार असल्याचे सांगितले होते. न्यायालयाने काल प्रत्येकी 25 हजार रुपयांची वैयक्‍तिक जातमुचलक्यावर पाचही आरोपींना जामीन मंजूर केला. दर रविवारी पोलिस ठाण्यात हजेरी, साक्षीदारांवर दबाव आणू नये, अशा अटी जामीन देताना घालण्यात आल्या आहेत. या गुन्ह्यात एकूण 44 जणांना अटक करण्यात आली होती. त्यातील 5 जणांना जामीन मंजूर झाला असून, इतर 39 जणही लवकरच जामिनासाठी अर्ज करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Tags : Ahmadnagar, Bail, Five, people, including, MlA, Shivaji Kardile