Tue, Nov 13, 2018 04:34होमपेज › Ahamadnagar › उपमहापौर निवडणुकीतून  भाजपची माघार!

नगर : उपमहापौर निवडणुकीतून  भाजपची माघार!

Published On: Mar 01 2018 12:45PM | Last Updated: Mar 01 2018 12:45PMअहमदनगर : प्रतिनिधी

अहमदनगर महापालिकेच्या ५ मार्च रोजी होत असलेल्या उपमहापौर निवडणुकीतून भारतीय जनता पार्टीने माघार घेतली आहे. मुंबई येथे आज प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री राम शिंदे, खा. दिलीप गांधी, अभय आगरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत श्रीपाद छिंदमने केलेल्या वक्तव्याचा निषेध व प्रायश्चित्त म्हणून भाजपने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी पुढारी ऑलाईनशी बोलताना सांगितले.

दरम्यान, भाजप उमेदवार देणार नसल्याबाबत 'पुढारी'ने प्रकाशित केलेल्या वृत्तावर आज शिक्कामोर्तब झाले आहे.