Fri, Apr 19, 2019 08:41होमपेज › Ahamadnagar › नगरमध्ये भाजप, काँग्रेस, राष्‍ट्रवादीकडून दहशत

नगरमध्ये भाजप, काँग्रेस, राष्‍ट्रवादीकडून दहशत

Published On: Apr 08 2018 2:56PM | Last Updated: Apr 08 2018 3:08PMनगर : प्रतिनिधी 

नगरमध्ये भाजप, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे दहशत निर्माण करत आहेत. पोट निवडणुकीतही त्यांनी अशाच पध्दतीने शिवसेनेला शह दिला. शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची निघृण हत्या करण्यात आली. त्याच्या चौकशीसाठी आमदार संग्राम जगताप यांना आणल्यानंतर २०० ते २५० जणांच्या जमावाने पोलिस अधिक्षक कार्यालयावर हल्ला केला. त्यामुळे हे युपी आहे की महाराष्ट्र असा सवाल करत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत केली.

वाचा : नगर खून प्रकरण : आमदार जगतापांसह चौघांना अटक

यावेळी कदम म्हणाले की, या बाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची उद्या भेट घेणार आहोत. तपासात व गुन्ह्यात कुठल्याही त्रूटी राहू नयेत, याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. सहाय्यक पोलिस अधिक्षक अक्षय शिंदे व पोलिस निरीक्षक अभय परमार यांना तात्काळ निलंबित करावे. त्यांच्या संगनमतानेच राष्ट्रवादी कॉंग्रेसची दहशत सुरु आहे. बूथवर येवूनही त्यांनी शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना शिविगाळ केली होती. पोलिसांशी संगनमत असल्याने हिम्मत वाढत गेली. कायदा व सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. त्यामुळे ज्यांनी खून केलाय त्यांना फाशीच व्हायला हवी. शहरात अशीच परिस्थिती कायम राहिली तर शिवसेना आपल्या पध्दतीने उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला.

वाचा: गोळ्या झाडून 2 शिवसैनिकांची हत्या

दरम्यान, मृत शिवसैनिकांच्या परिवाराची जबाबदारी पक्षाने घेतली आहे. शिवसेना सत्तेत किती सहभागी आहे हे सर्वांनाच माहिती आहे. सरकारला आमचा फक्त टेकू आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी असा पुर्नउच्चार त्यांनी केला. समझने वालोंको इशारा काफी है, असे म्हणत पक्ष पातळीवर पक्ष प्रमुख निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, खा सदाशिव लोखंडे, उपनेते अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम आदी उपस्थित होते.

Tags : ramdas kadam, shivsena, deepak kesarkar, nagar, ahmednagar, kedgaon murder case