Sun, Aug 25, 2019 07:57होमपेज › Ahamadnagar › राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी  भाजपा-शिवसेना युती गरजेची

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी  भाजपा-शिवसेना युती गरजेची

Published On: Feb 13 2018 2:05AM | Last Updated: Feb 13 2018 12:39AMत्र्यंबकेश्‍वर : वार्ताहर

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा-सेना युती होणे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार केले.

त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी  त्र्यंबकेश्‍वर येेथे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी (दि.12) भेट दिली. त्र्यंबकराजाच्या मंदिरात दोघांनी पूजा, अभिषेक केला. ना. मुनगंटीवार व केसरकर यांनी मंदिराच्या परंपरेची तसेच पौराणिक माहात्म्याची माहिती देवस्थान ट्रस्टच्या अधिकार्‍यांच्या कडून घेतली.

याप्रसंगी ना.  केसरकर  म्हणाले की, मागील पंधरा वर्षांत काँग्रेस व राष्ट्रवादीने राज्याचे वाटोळे केले. तेव्हाचा 4.5 टक्क्यांवर असलेल्या विकासाचा दर हा गेल्या तीन वर्षांत 9 टक्क्यांपर्यंत आला आहे. यामुळेच सर्वसामान्य, शेतकरी, दलित, आदिवासी या सर्वांसाठी सरकार उत्तम काम करत असून ही विकासाची गती वाढविण्यासाठी येत्या आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षाची युती होणे आवश्यक  आहे.