Sun, Jul 21, 2019 02:07होमपेज › Ahamadnagar › भाजपाच्या आ. राम कदम यांच्या वक्तव्याचा काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेकडून जोरदार निषेध

अकोले, संगमनेरात ‘जोडे मारो’ आंदोलन

Published On: Sep 07 2018 1:04AM | Last Updated: Sep 06 2018 11:07PMअकोले, संगमनेर : प्रतिनिधी

भाजप आमदार राम कदम यांनी महिलांच्या बाबतीत जे वादग्रस्त विधान केले. त्याचा काल अकोले तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला तसेच संगमनेरात शिवसेना महिला आघाडीच्या सदस्यांनी ‘जोडे मारो’ तर काँग्रेसने मोर्चोद्वारे या घटनेचा निषेध नोंदविला.

यावेळी  महिला तालुकाध्यक्षा चंद्रकला धुमाळ,  नगराध्यक्षा संगीता शेटे, माजी सभापती अंजनाताई बोंबले, युवती अध्यक्षा शितल तिकांडे, नगरसेविका स्वाती शेणकर, विमल भोईर यांनी भाजप आमदार राम कदम यांना त्वरित अटक करून गुन्हा दाखल करावा व आमदारकी रद्द करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.  

या आंदोलनास, नगरसेविका कीर्ती गायकवाड, निशिगंधा नाईकवाडी, कुमुदिनी पोखरकर, माधवी जगधने यांच्यासह पक्षाचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, अकोलेचे माजी सरपंच संपत नाईकवाडी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, नगरसेवक प्रकाश नाईकवाडी, सचिन शेटे, युवक नेते राहुल देशमुख, परशुराम शेळके, विजय पवार आदी उपस्थित होते. प्रारंभी सर्व महिलांनी आमदार राम कदम मुर्दाबाद अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. महिलांनी आमदार राम कदम यांच्या बनविलेल्या फ्लेक्सवर रावण कदम असे नाव टाकल्याने, मोठा हशा पिकला  होता. राष्ट्रवादीच्या सर्व महिला प्रतिनिधींनी आणि आदिवासी  महिलांनी  आमदार कदम यांच्या प्रतिमेस चपलाने मारून निषेध व्यक्त केला. 

संगमनेरात आमदार  कदम यांच्या पुतळ्यास संगमनेर शहर  शिवसेनेच्या  व महिला शिवसेनेच्या वतीने जोडे मारो आंदोलन करत त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. शहरातील  नवीन नगर रोड येथे शिवसेना व महिला शिवसेनेच्या वतीने राम कदम यांच्या पुतळ्यास  महिला शिवसेनाआघाडीच्या जिल्हा  संपर्क प्रमुख शुभांगी नांदगावकर यांच्या नेतृत्त्वाखाली महिला आघाडीच्या शहरप्रमुख संगीता गायकवाड तालुकाप्रमुख शितल हासे माजी तालुकाप्रमुख सुरेखा गुंजाळ  या महिलां पदाधिकार्‍यांसह इतर महिला शिवसैनिकांनी कदम यांच्या कापडी पुतळ्यास जोडे मारत अभिनव असे आंदोलन केले. या आंदोलनात शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी, नगरसेवक लखन घोरपडे होते.

संगमनेर बसस्थानकासमोर नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्त्वाखाली महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी  सभापती निशाताई कोकणे, अर्चना बालोडे, रंजना गंवादे, अ‍ॅड. निशाताई शिऊरकर, अ‍ॅड. योती मालपाणी, सुहासिनी गुंजाळ, प्रमिला अभंग, सोनाली शिंदे, पुष्पा कोल्हे, अनुराधा आहेर, वंदना गुंजाळ, सुनंदा जोवकर, नंदा कढणे आदीसह सुमारे चारशेपेक्षा अधिक महिला कार्यकर्त्या व काँग्रेसचे कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते.