Fri, Apr 26, 2019 09:21होमपेज › Ahamadnagar › भाजप सरकार घोषणा बहाद्दर : डॉ. विखे

भाजप सरकार घोषणा बहाद्दर : डॉ. विखे

Published On: Jan 21 2018 2:43AM | Last Updated: Jan 20 2018 10:25PMकोरडगाव : वार्ताहर

शेतकर्‍यांना  कर्जमाफी, अंगणवाडी सेविकांचे मानधनवाढ, डॉ.बाबासाहेब आबेडकरांचे स्मारक, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकांचे काय झाले? उद्घाटन करणे हेच भारतीय जनता पक्षाचे काम असून,अंमलबाजवणी मात्र शून्य. जनतेने कोणावर विश्वास ठेवायचा हे ठरविले पाहिजे. पूर्वीचे सरकार खूप कार्यक्षम होते असेही नाही परंतु ते जनतेसाठी निर्णय तरी घेत होते, असे प्रतिपादन डॉ.सुजय विखे यांनी केले. 

कोरडगाव येथे डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या वतीने आयोजित मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी विखे बोलत होते. ज्येष्ठ नेते काशिनाथ लवांडे, मोहन पालवे, काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष अजय रक्ताटे,  सरपंच विष्णू देशमुख, सेवा संस्थेचे अध्यक्ष नारायण काकडे, दामूआण्णा काकडे, रमेश दहिफळे, डॉ.राहुल देशमुख, माजी उपनगराध्यक्ष बंडू बोरुडे, प्रतिक खेडकर,पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण उपस्थित होते.

यावेळी बोलताना विखे म्हणाले, ज्या जिरायत भागात आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत अशा भागात शिबिराचे आयोजन करून मोफत रुग्ण सेवा करण्यासाठी जिल्ह्यात 75  शिबिरांचे आयोजन करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. आगामी काळात मी पाथर्डी तालुक्याच्या प्रत्येक गावामधे जाणार आहे. 

गाव तेथे जनसेवा युवक फांऊडेशनची संघटना युवकांच्या माध्यमातून उभी करणार आहे. संघटनेत केवळ सदस्य हेच पद राहील. मी कार्यकर्त्यांची मते जाणून घेत आहे. त्यांचा प्रतिसाद कसा मिळतो तो पाहू आणि मगच निर्णय घेऊ.