Sun, Feb 23, 2020 10:44होमपेज › Ahamadnagar › औरंगाबाद ते पंढरपूर व्यसनमुक्तीची दिंडी

औरंगाबाद ते पंढरपूर व्यसनमुक्तीची दिंडी

Published On: Jul 14 2018 12:48AM | Last Updated: Jul 13 2018 10:44PMपाथर्डी : शहर प्रतिनिधी 

पंढरीची वारी खर्‍या अर्थाने परिवर्तन व प्रबोधनाची ठरावी, यासाठी औरंगाबाद जिल्हा पोलिस दलातील कर्मचारी व तालुक्याचे सुपूत्र बाळासाहेब राठोड व त्यांचे सहकारी गेल्या तीन वर्षापासून औरंगाबाद ते पंढरपूर अशी व्यसनमुक्तीची दिंडीचे आयोजन करीत आहे.तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन व कॅन्सर असा प्रबोधनाचा मुख्य विषय आहे. बुधवारी दुपारी अशी दिंडी शहरात दाखल होताच नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे, बर्ड संस्थेचे समन्वयक डॉ.दीपक देशमुख, हौशी गिर्यारोहक डॉ. भाऊसाहेब लांडे, डॉ.शिरीष जोशी, राजेंद्र काळे,भाऊसाहेब गोरे आदी उपस्थित होते.

या उपक्रमाबाबत माहिती देताना मुख्य संयोजक पोलिस कर्मचारी बाळासाहेब राठोड म्हणाले, दिंडी हेच प्रबोधनाचे मुख्य माध्यम मानून गेल्या तीन वर्षापासून थेट अभियान सुरू असले तरी गेल्या बारा वर्षांपासून व्यसनमुक्तीचे काम करताना अनेक पोलिस कर्मचारी, युवक अगदी आरोपींना सुद्धा व्यसनमुक्त केले. दिंडीमध्ये सहभागी होणार्‍या बहुसंख्य वारकरी ग्रामीण भागातील असतात. यातील अनेकांना विडी, तंबाखू ,सिगारेट आदींचे व्यसन असते.

दिंडी केवळ पांडूरंगाचे नाव घेण्यापुरती मर्यादित नसून त्यातील व्यापकत्व लक्षात घेतल्यास सामाजिक समानता,जातीय सलोखा ,धार्मिक प्रबोधनाबरोबरच वैचारिक प्रबोधन करणारी महत्त्वाचे माध्यम ठरते . कॅन्सरमुक्त दिंडीमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील जगदीश खैरनार ,भगवान राऊत ,अशोक भिंगारे, तुकाराम चव्हाण, श्रीराम गोरे, धन्यकुमार शिंगरे, आकाश जाधव, नवनाथ चव्हाण,भारत मारकड आदी वारकरी सहभागी झाले आहेत.वाटेत चालताना मोठ्या मोठ्या दिंड्या विसावलेल्या दिसल्या की तेथेही प्रबोधन केले जाते .गावो गावच्या लोकांकडून उत्स्फूर्त स्वागत केले जाते. सर्व कार्यकर्ते ग्रामस्थांशी संवाद साधतात .या कार्यात पुढील वर्षापासून विविध गावचे जागरुक  वारकरी सहभागी होणार आहेत. पंढरपूर दिंडीसाठी दररोज सुमारे 30 ते 35 किलोमीटर अंतर चालत जात मुक्कामाच्या ठिकाणी मनोरंजनातून प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले जातात.