Thu, Jun 20, 2019 01:58होमपेज › Ahamadnagar › जिल्हा बँकेची शाखा फोडण्याचा प्रयत्न

जिल्हा बँकेची शाखा फोडण्याचा प्रयत्न

Published On: Aug 02 2018 1:55AM | Last Updated: Aug 02 2018 12:42AMजामखेड : प्रतिनिधी 

तालुक्यातील अरणगाव येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र बँकेचा सायरन वाजल्याने चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. दुसर्‍या घटनेत त्याच दिवशी जामखेड येथील नगर रोड येथील बिअर शॉपीचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी 74 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.

पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की, अरणगाव येथे जिल्हा सहकारी बँकेची शाखा आहे. सोमवारी (दि. 30) सायंकाळी कामकाज संपल्यानंतर व्यवस्थापक व कर्मचारी बँक बंद करून घरी गेले. मंगळवारी (दि. 31) रोजी पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बँकेच्या समोरील बाजूच्या शटरचे कुलूप व सीसीटीव्ही कॉमेरे तोडले. तसेच आत जाऊन बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला.

मात्र याच दरम्यान बँकेचा सायरन मोठ्याने वाजल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला. तसेच सायरन वाजल्याने ग्रामस्थांना जाग आली. त्यांनी बँकेकडे धाव घेतली असता, चोरट्यांनी बँक फोडल्याचे लक्षात आले. या प्रकरणी बँकेचे व्यवस्थापक पंडित रंगनाथ सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसर्‍या घटनेत जामखेड शहरातील नगररोड येथील बिअर शॉपी पहाटे पावणेचारच्या सुमारास फोडण्यात आली. यावेळी चोरट्यांनी 74 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी बिअर शॉपीचे मालक युवराज रामचंद्र पोकळे (रा. पोकळेवस्ती) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चार चोरट्यांच्या विरोधात जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. ना. भागवत हे करत आहेत.