Sun, Jul 21, 2019 00:17होमपेज › Ahamadnagar › छिंदमचे कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न!

छिंदमचे कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न!

Published On: Feb 19 2018 1:58AM | Last Updated: Feb 18 2018 11:34PMनगर : प्रतिनिधी

शिवजयंती व छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्‍तव्यानंतर तीव्र पडसाद उमटल्यानंतर काल (दि.18) श्रीपाद छिंदम याच्या दिल्लीगेट येथील कार्यालयावर अज्ञात व्यक्‍तींनी हल्ला चढविला. दुपारच्या सुमारास पेट्रोलची पेटती बाटली फेकून बंद कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मनपा कर्मचार्‍याशी संबाद साधतांना छिंदम याने शिवरायांबद्दल अपशब्द वापरल्याची ऑडियो क्‍लिप शुक्रवारी (दि.16) व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली. राजकीय पक्ष, विविध संघटनांकडून छिंदमच्या वक्‍तव्याचा निषेध करण्यात आला. छिंदम याच्या घर, कार्यालयावर संतप्त शिवप्रेमींनी हल्ला चढवून तोडफोड केली. तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन छिंदम याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, सबजेलमध्ये कैद्यांनीही छिंदमला ‘प्रसाद’ दिल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव त्याला नाशिक रोड जेलला हलविण्यात आले. दुसर्‍या दिवशीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी बंद, आंदोलने करुन छिंदमचा निषेध करण्यात आला. त्यानंतर काल पुन्हा अज्ञान व्यक्‍तींनी छिंदम दिल्लीगेट येथील कार्यालयावर हल्ला चढवला. बंदोबस्तास असलेल्या पोलिसांची नजर चुकवून अज्ञातांनी पेट्रोलची पेटती बाटली कार्यालयाच्या बंद शटरवर फेकली. त्यामुळे परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.