Tue, Mar 19, 2019 09:13होमपेज › Ahamadnagar › संगमनेरात मायलेकीवर अत्याचार

संगमनेरात मायलेकीवर अत्याचार

Published On: Jun 24 2018 1:32AM | Last Updated: Jun 23 2018 11:31PMसंगमनेर : प्रतिनिधी

अर्धांगवायूच्या धक्क्याने बिछान्याला खिळलेल्या पतीच्या  असहाय्यतेचा फायदा घेऊन त्याच्या शिक्षक  असणार्‍या पत्नीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्यावर व तिच्या अल्पवयीन मुलीवरही अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना नुकतीच उघडकीस आली. दरम्यान, पोलिसांनी त्या नराधमावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्यास गजाआड केले. 

भाऊसाहेब मनोहर सोनवणे (रा. नान्नज दुमाला) असे आरोपीचे नाव आहे.  तालुक्याच्या  ग्रामीण भागातील शिक्षिका असणार्‍या महिलेच्या पतीला  अर्धांगवायूचा धक्का बसलेला असल्याने  ते अंथरूनला खिळून बसले आहेत. त्याच दरम्यान नान्नज दुमाला येथील भाऊसाहेब सोनवणे याचे त्या महिलेच्या घरी जाणे-येणे सुरू झाले. त्यातूनच त्यांच्यातील जवळीक वाढली व त्यांच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले. त्यात सोनवणे याने या महिलेच्या असाह्यतेचा गैरफायदा घेऊन त्याने तिच्यावर अनेकवेळा अत्याचार केले तसेच तिच्या अल्पवयीन मुलीचे अश्‍लील फोटो काढून अत्याचार  केला. त्यानंतर ही गोष्ट कोणाला सांगितल्यास तुझी व तुझ्या आईची बदनामी करण्याची धमकी त्याने  दिली.

या सर्व प्रकाराला वैतागलेल्या त्या मुलीने अखेर हा प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर संतप्त झालेल्या त्या मुलीच्या आईने सोनवणे याच्या घरी जाऊन त्याला चपलेचा प्रसाद दिला 

या माय-लेकीने शुक्रवारी रात्री शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी तशी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी भाऊसाहेब मनोहर सोनवणे याच्या विरोधात अत्याचाराचा गुन्ह्यासह बाललैंगिक अत्याचारास प्रतिबंध करणार्‍या (पॉस्को) कायद्याच्या कलम 4, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यास तात्काळ अटक केली आहे. आरोपीला मंगळवारपर्यंत (ता.26) पोलिस कोठडी सुनावली आहे.