Sat, Feb 16, 2019 15:11होमपेज › Ahamadnagar › पिस्तूल, काडतुसे बाळगण्यास परवानगी

पिस्तूल, काडतुसे बाळगण्यास परवानगी

Published On: Apr 22 2018 1:11AM | Last Updated: Apr 22 2018 12:14AMनगर : प्रतिनिधी

केडगाव येथे पोलिसांवर दगडफेक व इतर गैरकृत्य केल्याप्रकरणी शिवसैनिकांविरुद्ध फिर्याद दिलेल्या सहाय्यक फौजदार लक्ष्मण हंडाळ यांना एक पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगण्यास पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी परवानगी दिली आहे. त्यांच्या जिवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी ही दक्षता घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

केडगाव येथील दुहेरी हत्याकांडानंतर शिवसैनिकांनी पोलिसांवर दगडफेक करून वरिष्ठ अधिकार्‍यांना अश्‍लील शिवीगाळ केली होती. सरकारी वाहनांची तोडफोड करून खासगी दुकानांच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करून मृतदेहाची विटंबना करण्यात आली होती. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यातील केडगाव चौकीत नियुक्तीस असलेल्या व घटनास्थळी सुरुवातीला गेलेल्या सहाय्यक फौजदार हंडाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी पोलिसाच्या जिवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस अधीक्षक शर्मा यांनी काल (दि. 21) हंडाळ यांना एक पिस्तूल व जिवंत काडतुसे सोबत बाळगण्यास परवानगी दिलेली आहे. अद्याप शिवसैनिकांच्या अटकेचे सत्र सुरू करण्यात आलेले नाही.