Sat, Sep 22, 2018 19:12होमपेज › Ahamadnagar › स्वच्छ सर्वेक्षण जनजागृतीसाठी महापौरांकडून आवाहन!

स्वच्छ सर्वेक्षण जनजागृतीसाठी महापौरांकडून आवाहन!

Published On: Feb 13 2018 10:18AM | Last Updated: Feb 13 2018 10:17AMनगर : प्रतिनिधी 

पुढील आठवड्यात केंद्र सरकारच्या पथकामार्फत शहरात होत असलेल्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या जनजागृतीसाठी व नागरिकांनी स्वच्छतेचे मोबाईल ॲप डाउनलोडिंग करण्यासाठी महापौर सुरेखा कदम स्वत: रस्त्यावर उतरल्या आहेत. मंगळवारी सकाळी महापौर कदम, विरोधी पक्ष नेते बाळासाहेब बोराटे यांनी वाडिया पार्कमध्ये 'मॉर्निंग वॉक'साठी आलेल्या ज्येष्ठ नागरिक, महिला व युवक-युवतींना सर्वेक्षणाची माहिती देऊन ॲप डाउनलोड करण्याचे आवाहन केले.

स्वच्छ सर्वेक्षणाबाबत नागरिकांनी दक्ष रहावे. ॲप डाउनलोड करून कचऱ्याबाबत आपल्या परिसरातील समस्या, तक्रारीची माहिती ॲपवर टाकावी. २४ तासांच्या आत त्यावर उपाययोजना होतील. सर्वेक्षणात चुकीची माहिती देवू नये. नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादावर मनपाला १५०० पैकी गुण मिळणार आहे. सर्वेक्षणाच्या आधारावरच भविष्यात उपाययोजनांसाठी मनपाला निधी मिळणार आहे, असे महापौर कदम यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते बोराटे, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम, स्वच्छता दूत शारदा होशिंग, केअर टेकर नरेश छजलानी, स्वच्छता निरीक्षक टी. एन. भांगरे यांनीही नागरीकांशी संवाद साधून स्वच्छ सर्वेक्षण व ॲप डाउनलोडिंगची माहिती दिली.