Thu, Jul 18, 2019 04:07होमपेज › Ahamadnagar › प्रभागनिहाय मतदार यादीची लगबग

प्रभागनिहाय मतदार यादीची लगबग

Published On: Jul 30 2018 1:28AM | Last Updated: Jul 30 2018 12:45AMनगर : प्रतिनिधी

माहे ऑक्टोंबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी संगणकीकृत प्रभागनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार जिल्हाभरातील बुरुडगाव , टाकळीमियाँ, घारगाव,  घोडेगाव, पानसवाडी, टाकळीमानूर आदींसह 68 ग्रामपंचायतींची 14 ऑगस्ट रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. 

जिल्हाभरातील 117 ग्रामपंचायतींच्या सप्टेंबर 2019 अखेरपर्यंत मुदती संपणार आहेत. त्यानुसार या गावांतील प्रभागरचना व आरक्षण ठरविण्याचा कार्यक्रम गेल्या महिन्यात ग्रामपंचायतनिहाय राबविला गेला आहे.  31 जुलैपर्यंत हरकती व सूचना निकाली निघणार आहेत.  त्यानंतर सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला जाणार आहे. जिल्हाधिकारी 9 ऑगस्टपर्यंत प्रभाग रचनेला अंतिम मान्यता  देणार आहेत.

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने नुकताच  माहे ऑक्टोबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत मुदत संपणार्‍या जिल्हाभरातील 68 ग्रामपंचायतींच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यासाठी 10 जुलै 2018 या दिवशी अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघाची यादी वापरण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. 

त्यानुसार जिल्हाभरातील 68 गावांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी संगणकीकृत पध्दतीने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यानुसार महसूल यंत्रणा सक्रीय झाली आहे. 14 ऑगस्ट रोजी प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी तयार करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. या  यादीवर 20 ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना मागविल्या जाणार आहेत. त्यानंतर जिल्हा प्रशासन 24 ऑगस्ट 2018 रोजी या ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी ग्रामपंचायत, तलाठी सजा, मंडल अधिकारी, पंचायत समिती व तहसील कार्यालयांच्या सूचना फलकावर प्रसिध्द करणार आहे. 

प्रभागनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे या गावांत निवडणुकीची चाहुल लागली आहे.नगर तालुक्यातील बुरुडगाव, राहुरी तालुक्यातील मुसळवाडी, टाकळीमियॉ, श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव, कोपरगाव तालुक्यातील धामोरी,जामखेड तालुक्यातील जवळा, नेवासा तालुक्यातील घोडेगाव, बेलपांढरी, पानसवाडी, पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानूर, करंजी, शंकरवाडी, संगमनेर तालुक्यातील सारोळे पठार, अकोले तालुक्यातील रतनवाडी, अंबित आदी राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या गावांत आता निवडणुकीची पूर्वतयारी सुरु झाली आहे.