Wed, Nov 14, 2018 18:46होमपेज › Ahamadnagar › अण्णा पुन्हा एकदा उपोषणाला बसणार...

अण्णा पुन्हा एकदा उपोषणाला बसणार...

Published On: Jul 29 2018 6:09PM | Last Updated: Jul 29 2018 6:09PMराळेगण सिद्धी: पुढारी ऑनलाईन

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. येत्या २ ऑक्टोबरपासून अण्णांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. केंद्र सरकार लोकपाल नियुक्तीला उशिर करत असल्याने अण्णांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. 

येत्या २ ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधींच्या जयंती दिनापासून राळेगण सिद्धी येथे मी उपोषणाला बसणार असल्याचे अण्णा हजारे यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. या आंदोलनात जनतेने देखील मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे  आवाहन अण्णांनी केले आहे. 

लोकपालाच्या नियुक्तीसंदर्भात अण्णांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. लोकपाल विधेयक मंजूर करून तातडीने लोकपालाची नियुक्ती केली जाईल, असे आश्वासन जानेवारी २०१४मध्ये दिल्याचे अण्णांनी सांगितले. पण अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे उपोषण सुरु करणार असल्याचे अण्णा म्हणाले. याआधी २०११मध्ये अण्णांनी भ्रष्टाचाराविरोधात १२ दिवसांचे उपोषण केले होते.