Thu, Apr 25, 2019 04:05होमपेज › Ahamadnagar › खडसे, भुजबळांना पुरून उरेल : अंजली दमानिया 

खडसे, भुजबळांना पुरून उरेल : अंजली दमानिया 

Published On: Jun 21 2018 1:29AM | Last Updated: Jun 20 2018 11:43PMजळगाव : प्रतिनिधी

मुक्‍ताईनगर पोलिस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा हा मुळातच खोटा आहे. खडसे यांना षड्यंत्र हा शब्द खूप आवडतो. कारण ते सर्वांविरुद्ध षड्यंत्र करीत असतात. त्यांनी षड्यंत्र करून न्यायालय, पोलिसांची फसवणूक केली आहे. मुख्यमंत्री त्यांना घाबरतात म्हणूनच त्यांना भोसरी प्रकरणात क्लीन चिट दिली. पण, असे 10 खडसे व भुजबळ आले तरी माझा मुकाबला करू शकणार नाही, असा ठाम निर्धार अंजली दमानिया यांनी व्यक्‍त केला. 

खडसे यांनी मुक्‍ताईनगर न्यायालयात दमानिया यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती. यावर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या खटल्यात जबाब नोंदविण्यासाठी त्या बुधवारी न्यायालयात आल्या होत्या. 

दमानिया म्हणाल्या, मुळात हा गुन्हा खोटा आहे. कारण  जेव्हा उच्च न्यायालयात पीएल दाखल झाले. त्यावेळेस यांनासुद्धा एक प्रत मिळाली असेल. मात्र, पोलिसांची दिशाभूल करून चौकशी करण्याचे पोलिसांना पत्र दिले. पोलिसांनी चौकशी केली असता हे डिमांड ड्रॉफ्ट बनावट असल्याचे सांगितले आहे. मात्र, जर हे डीडी बनावट व चोरी गेलेले असेल तर त्याबाबत आतापर्यंत तक्रार का करण्यात आली नाही, असा सवालही त्यांनी केला.