Sun, Aug 25, 2019 23:27होमपेज › Ahamadnagar › भाजपा हा टाळ्या मिळविणार्‍यांचा पक्ष!

भाजपा हा टाळ्या मिळविणार्‍यांचा पक्ष!

Published On: Sep 09 2018 2:11AM | Last Updated: Sep 08 2018 11:49PMनगर : प्रतिनिधी

महापालिकेत भाजपाची सत्ता आणण्यासाठी पक्षाने तयारी सुरु केली आहे. मात्र, सत्ता आणण्यासाठी केवळ आयात उमेदवार चालणार नाहीत. जुन्या कार्यकर्त्यांनाही उमेदवारी द्यावी, अशी मागणी भाजपाचे अनिल गट्टाणी यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. ‘भाजप’ हा टाळ्या मिळविणार्‍यांचा पक्ष झालाय’ अशा प्रतिक्रीया व्यक्त होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

पक्षाच्या विद्यमान पदाधिकार्‍यांकडून तिकीट वाटपात जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना कायम डावलले जाते. नव्याने पक्षात आलेल्या तथाकथीत उमेदवारांना तिकीटे देवून सत्ता येणार नाही. जुन्या कार्यकर्त्यांना डावलल्यामुळेच आजतागायत मनपात सत्ता आलेली नाही. त्यामुळे पक्षाला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अशा कार्यकर्त्यांना एकत्र बोलावून आपण स्वतः चर्चा करावी. यावेळी विद्यमान पदाधिकार्‍यांना बोलावू नये. तिकीट वाटपाच्या समितीत निष्ठावान कार्यकर्त्यांना सामील करावे. गटबाजीत गुंतलेल्या विद्यमान पदाधिकार्‍यांना या प्रक्रियेपासून दूर ठेवावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.