Sat, Dec 14, 2019 04:53होमपेज › Ahamadnagar › अहमदनगर : भंडारदरा धरण भरले 

अहमदनगर : भंडारदरा धरण भरले 

Published On: Aug 03 2019 4:25PM | Last Updated: Aug 03 2019 4:25PM

अमदनगर : भंडारदरा धरणअहमदनगर : प्रतिनिधी

उत्तर नगर जिल्ह्यासाठी संजीवनी असलेले भंडारदरा धरण आज दुपारी २ वाजता भरले असल्याचे जलसंपदा विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. धरणाचा पाणीसाठा १०,५०० दलघफू (दशलक्ष घनफूट) झाला आहे. 

धरणातून सद्या वीजनिर्मितीद्वारे ८२५ क्यूसेक, तसेच स्पिलवेद्वारे ३६००  क्यूसेक असे एकूण ४४२५ क्यूसेकने धरणातून विसर्ग सोडण्यात आला आहे. मागच्या वर्षी ९ ऑगस्टला धरण भरले होते.

भंडारदरा धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग निळवंडे धरणात येणार असल्यामुळे लगेच प्रवरा नदीतील प्रवाह वाढणार नाही. निळवंडे धरणाचा पाणीसाठा ४५०० दलघफू (दशलक्ष घनफूट) आहे.

निळवंडे धरण भरल्यानंतर प्रवरा नदीत विसर्ग सोडण्यात येईल. प्रवरा नदीकाठच्या गावांना सध्या कूठल्याही प्रकारचा धोका नाही. धरणातील विसर्ग वाढवताना वेळोवेळी महसूल व पोलिस विभागांना कळविण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली.