Wed, Apr 24, 2019 07:30होमपेज › Ahamadnagar › अहमदनगर जिल्‍हा-सत्र न्‍यायाधीशांची सहा महिन्‍यात बदली

अहमदनगर जिल्‍हा-सत्र न्‍यायाधीशांची सहा महिन्‍यात बदली

Published On: Jan 18 2018 1:37PM | Last Updated: Jan 18 2018 1:37PM

बुकमार्क करा
अहमदनगर : प्रतिनिधी

येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश माळी यांची सुमारे सहा महिन्यात औरंगाबाद येथे बदली झाली आहे. त्यांना नगरमध्ये एक वर्षाचाही कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. जवखेडे खालसा य़ेथील तिहेरी हत्याकांडाचे कामकाज त्यांच्यासमोर चालले होते. या खटल्यात आतापर्यंत तीन न्यायाधीश बदलले आहेत. आता यापुढे चौथ्या न्यायाधीशांसमोर हा खटला चालणार आहे. माळी यांची औरंगाबाद येथे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून बदली करण्यात आली आहे. अहमदनगरला अद्याप कुणाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.