Wed, Nov 21, 2018 14:03होमपेज › Ahamadnagar › अहमदनगर उपमहापौरपदी अनिल बोरुडे बिनविरोध

अहमदनगर उपमहापौरपदी अनिल बोरुडे बिनविरोध

Published On: Mar 05 2018 11:29AM | Last Updated: Mar 05 2018 11:29AMनगर : पुढारी ऑनलाईन

महापालिकेच्या उपमहापौरपदी शिवसेनेचे अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड झाली. कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह मनसे व बंडखोर गटाने अर्ज मागे घेतल्याने बोरुडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, महापालिकेच्या इतिहासात शिवसेनेचा एकाचवेळी शिवसेनेचेच महापौर व उपमहापौर होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

भारतीय जनता पार्टीने छिंदम प्रकरणाचे प्रायश्चित्त म्हणून आधीच निवडणुकीतून माघार घेतली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही आज सकाळीच पत्रकार परिषद घेवून घोडेबाजार टाळण्यासाठी माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे विपुल शेटीया व आरिफ शेख यांनी अर्ज मागे घेतले. मनसे व बंडखोर गटानेही शिवसेनेशी झालेल्या चर्चेनंतर माघर घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे वीणा बोज्जा, समद खान, मुदस्सर शेख यांनी अर्ज मागे घेतले. शिवसेनेच्या नाराज दीपाली बारस्कर यांचीही नाराजी दूर करण्यात पदाधिकाऱ्यांना यश आल्यामुळे त्यांनीही अर्ज मागे घेत अनिल बोरुडे यांचा मार्ग मोकळा केला. 

पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या अध्यक्षतेखाली निवडीची औपचारिक प्रक्रिया पार पडून बोरुडे यांची बिनविरोध निवड जाहीर झाली. छिंदम याच्यावर कारवाई केल्यानंतर त्याने राजीनामा दिल्याने हे पद रिक्‍त झाले होते.