होमपेज › Ahamadnagar › नगरमध्ये मनपाची शहर बससेवा बंद!

नगरमध्ये मनपाची शहर बससेवा बंद!

Published On: Mar 12 2018 11:26AM | Last Updated: Mar 12 2018 11:26AMनगर : प्रतिनिधी

महापालिका प्रशासनाने थकविलेली ८० लाखांची नुकसान भरपाई व करारनाम्यातील अटी शर्तीचा भंग केल्याप्रकरणी नोटीस बजावूनही दखल न घेण्यात आल्यामुळे अभिकर्ता संस्था यशवंत ऑटो प्रायव्हेट लिमिटेडने शहर बससेवा (एएमटी) आजपासून बंद केली आहे. सर्व गाड्यात डेपोतच असून एकही गाडी रस्त्यावर नसल्याचे संचालक धनंजय गाडे यांनी सांगितले.

ऐन परीक्षांच्या काळात सेवा बंद झाल्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना खासगी रिक्षा चालकांच्या मुजोरीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडून याबाबत काय निर्णय घेतला जातो याकडे लक्ष लागले आहे.