Thu, Jun 20, 2019 20:41होमपेज › Ahamadnagar › अहमदनगर : छिंदम याचा राजीनामा नाहीच

अहमदनगर : छिंदम याचा राजीनामा नाहीच

Published On: Feb 17 2018 7:35PM | Last Updated: Feb 17 2018 7:35PMअहमदनगर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्‍द वापरणारा उपमहापौर छिंदम याने राजीनामा दिलाच नसल्‍याचे समोर आले आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 19 (4) अन्वये उपमहापौर यांनी महापौर यांच्याकडे राजीनामा सादर केला पाहिजे. मात्र, छिंदम याने शुक्रवारी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्षांच्या नावे राजीनामा दिला आहे. त्याची प्रत शनिवारी दुपारी आयुक्त व महापौर कार्यालयात दिली.

महानगरपालिका अधिनियमान्वये महापौरांच्या नावाने राजीनामा देणे आवश्यक असताना तो भाजप महानगर जिल्हाध्यक्षांच्या नावाने दिला आहे. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या हा राजीनामा नाही. त्यामुळे छिंदम अजूनही उपमहापौर पदावर कायम आहे.