अहमदनगर : दिल्लीतील मरकजचा एकजण पाथर्डीत सापडला

Last Updated: Apr 10 2020 2:09PM
Responsive image


पुढारी वृत्‍तसेवा

दिल्लीतील तबलिगी कनेक्शन पाथर्डीपर्यंत येऊन पोहचले आहे. तालुक्यातील माणिकदौंडी येथे मकरज येथे जाऊन आलेला एक व्यक्ती सापडला आहे. संबंधित व्यक्तीसह कुटुंबातील १२ जणांना अहमदनगर येथील जिल्हा रूग्णालयात तपासणी करण्यासाठी आज (दि.१०) पाठवण्यात आले. दरम्‍यान, यामुळे पाथर्डीकरांच्या चिंतेत भर पडली आहे. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांनी माहिती दिली.