Wed, Jan 23, 2019 17:48होमपेज › Ahamadnagar › नगरः भानुदास कोतकरला जामीन मंजूर

नगरः भानुदास कोतकरला जामीन मंजूर

Published On: Feb 26 2018 4:00PM | Last Updated: Feb 26 2018 4:00PMनगरः प्रतिनिधी

अशोक लांडे खून प्रकरणात जन्मठेप झालेल्या भानुदास कोतकर याला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (दि. २६) जामिन मंजूर केला. मात्र, हा जामिन देताना न्यायालयाने कोतकरला नगरमध्ये जाण्यास तसेच परदेशात जाण्यास मज्जाव केला आहे. आजारपणाच्या उपचारासाठी हा जामिन मंजूर करण्यात आल्याचे न्यायालयाकडून सांगण्यात आले.

नगरच्या अशोक लांडे खून प्रकरणात भानुदास कोतकर, त्याची तीन मुले माजी महापौर संदीप याच्यासह सचिन व अमोल यांना दोषी ठरवत नाशिक सत्र न्यायालयाने या चौघांना जन्मठेप सुनावली होती. या प्रकरणातील अन्य आरोपी स्वप्निल पवार व वैभव अडसूळ यांना दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती.