Tue, Jul 23, 2019 10:31होमपेज › Ahamadnagar › नगर : चार महिन्यांपूर्वीच्या खुनाचा छडा लावण्यात यश

नगर : चार महिन्यांपूर्वीच्या खुनाचा छडा लावण्यात यश

Published On: Feb 24 2018 4:39PM | Last Updated: Feb 24 2018 4:45PMराहुरी : प्रतिनिधी

महात्मा फुले कृषी विद्यापीठाशेजारी चार महिन्यांपूर्वी झालेल्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. मयत किरण शेलारचा अनैतिक संबंधातून केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याचा किरणचा सख्खा भाऊ अमोर शेलार याला ताब्यात घेतले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,  कृषी विद्यापीठाशेजारील धर्माडी विश्रामगृहाच्या पायथ्याशी २३ ऑक्टोंबर रोजी तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्याचे तोंड दगडाने ठेचलेले व अर्धनग्न अवस्थेत होता. दरम्यान पोलिस प्रशासनाने तपास सुरू केल्यानंतर सदरचा मृतदेह किरण रावसाहेब शेलार(30वर्ष) रा. पिंप्री अवघड ता.राहुरी याचा असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावेळी किरणचा भाऊ अमोल रावसाहेब शेलार याच्यावर पोलिसांचा संशय होता. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी घटनेचा छडा लावण्यासाठी सायबर सेलचे सहकार्य घेतले. सायबर सेलचे पोलिस निरीक्षक सुनिल पवार यांनी घटनेची सविस्तर माहिती घेतल्यानंतर अमोलने खून केल्याच्या संशयाला बळकटी मिळाली. 

याप्रकरणाचा तपास करताना संशयित अमोल शेलारला तेलगाव ता. मुरबाड जि. ठाणे येथील घरातून चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी आपला खाक्या दाखविताच अमोल शेलारने घटनेचा उलगडा पोलिसांपुढ केला. मयत किरण शेलारची सासु नंदा सुदाम जाधव रा. जवळके सायाळ हिच्याशी अमोल शेलारचे अनैतिक संबंध होते अशी माहिती आरोपीने पोलिसांना दिली. याप्रकरणी श्रीरामपूर विभागाचे उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, सुनिल पवार, पोलिस हावलदार फुरकान शेख, प्रमोद जाधव, सचिन धनाड, बंडू बहिर, गुलाब मोरे, नवनाथ वाघमोडे, भिसे व चालक दातीर यांनी संशयिताचा शोध घेतला. पोलिसांची दोन पथके दुसर्‍या आरोपीचा शोध घेत आहेत.