Mon, Jun 24, 2019 17:23होमपेज › Ahamadnagar › मुख्यालये सोडू नका

मुख्यालये सोडू नका

Published On: Feb 17 2018 2:05AM | Last Updated: Feb 17 2018 2:05AMनगर : प्रतिनिधी

उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या वक्तव्याने जिल्हाभरातील वातावरण तापले आहे. या वक्तव्याची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली असून, कोणत्याही परिस्थितीत मुख्यालये सोडू नयेत, असे निर्देश तहसीलदार व उपविभागीय अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.

छिंदम यांच्या वक्तव्याने नगर शहरातील दिल्लीगेट परिसरात दगडफेक झाली आहे. अशीच परिस्थिती जिल्हयातील इतर भागात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत कार्यकारी दंडाधिकारी म्हणून कायदा व सुव्यवस्था राखणे कामी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालये सोडू नयेत, असे निर्देश अपर जिल्हादंडाधिकारी संदीप निचीत यांनी सर्वच तहसीलदार व उपविभागीय अधिकार्‍यांना दिले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपापल्या कार्यक्षेत्रातील पोलिस अधिकारी यांच्या संपर्कात राहून योग्य ती दक्षता घेण्यात यावी. आवश्यक त्या ठिकाणी कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती करावी, असे निर्देश देखील त्यांनी यावेळी दिले.

संबंधित बातम्या : 

पाथर्डीत एसटी बसच्या काचा फोडल्या

शिवरायांबाबत उपमहापौरांचे आक्षेपार्ह वक्तव्य!

सकल मराठा समाजाने केला छिंदम यांचा निषेध

छिंदम यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

उपमहापौरांचे घर, ऑफीसवर दगडफेक!

शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा छिंदम अटकेत(व्हिडिओ)

छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

नगर : उपमहापौरांच्या घरावर दगडफेक; तणाव (video)

उपमहापौरांना मनपात पाय ठेवू देणार नाही

वकील संघटनेकडून आज कोर्टातील कामकाज बंद

विरोध असूनही गांधींनी प्रतिष्ठा पणाला लावली!