Wed, Mar 20, 2019 22:56होमपेज › Ahamadnagar › आष्टी तालुक्याचा नगर जिल्ह्यात समावेश करा

आष्टी तालुक्याचा नगर जिल्ह्यात समावेश करा

Published On: Mar 17 2018 1:15AM | Last Updated: Mar 17 2018 1:15AMनगर : प्रतिनिधी

अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन झाल्यास आष्टी तालुक्याचा नगर जिल्ह्यात समावेश करावा, ही आष्टी तालुका कृती समितीची मागणी रास्त आहे. या मागणीस उद्योजक व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक बापूसाहेब डोके यांनी पाठिंबा दिला आहे.

डोके यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र शासन राज्यातील आकाराने मोठ्या असलेल्या जिल्ह्यांचे विभाजन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. विभाजनामध्ये अहमदनगर व बीड जिल्ह्यांचा समावेश असल्याचे समजते. दोन्ही जिल्हे आकाराने मोठे असून अहमदनगर मध्ये 14  व बीडमध्ये 11 तालुके आहेत. आष्टी तालुका बीड पासून सुमारे 100 कि.मी. अंतरावर आहे. दूर अंतरावर आहे. भौगोलिकदृष्ट्या नगर जिल्ह्याच्या कुशीत वसलेला आहे.

आष्टीचा नगर जिल्ह्यात समावेश करावा, ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. आष्टी परिसरापासून नगर शहर 20 ते 60 कि. मी. अंतरावर आहे. आष्टी तालुक्याचा बाजारपेठेच्या दृष्टीने नगर जिल्ह्यातील कर्जत, जामखेड, पाथर्डी, श्रीगोंदा व नगर शहराची संपर्क येतो. प्रशासकीय कामकाज वगळता  नागरिकांचे सर्व व्यवहार नगर शहरांशी जोडलेले आहेत. 

Tags : Ahamadnagar, Ahamadnagar News,  Ashti Taluka,