होमपेज › Ahamadnagar › आ. संग्राम जगताप घाटी रुग्णालयात!

आ. संग्राम जगताप घाटी रुग्णालयात!

Published On: May 28 2018 1:47AM | Last Updated: May 27 2018 11:11PMनगर : प्रतिनिधी

प्रकृती बिघडल्याने केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी आ. संग्राम जगताप यांना उपचारासाठी कारागृहातून घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सोमवारपासून (दि.21) त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

केडगाव पोटनिवडणुकीच्या निकालानंतर 7 एप्रिल रोजी सायंकाळी संजय कोतकर व वसंत ठुबे या दोघांची निर्घृण हत्या झाली. त्याच दिवशी रात्री उशिरा आ. संग्राम जगताप यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. 8 एप्रिल रोजी अटकेची कार्यवाही करण्यात आली आहे. तेव्हापासून आ. जगताप हे तुरुंगात आहेत. पोलिस कोठडी संपल्यापासून आ. जगताप यांचे वास्तव्य औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहात आहे. सोमवार, दि. 21 रोजी पासून त्यांना किडनीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे कारागृह प्रशासनाने त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलविले आहे. तेथे आ. जगताप यांच्यावर उपचार सुरू आहेत.