Tue, Mar 26, 2019 20:14होमपेज › Ahamadnagar › अंगावर दूध ओतून केला संताप व्यक्त!

अंगावर दूध ओतून केला संताप व्यक्त!

Published On: May 07 2018 2:00AM | Last Updated: May 07 2018 12:05AMटाकळी ढोकेश्वर : वार्ताहर

दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी राज्यभर दूध वाटप आंदोलन सुरू आहे. पारनेर तालुक्यात भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून आंदोलन तीव्र करण्यात येत असून, वडगाव सावताळ येथे सरकारच्या धोरणांचा निषेध करत दूध उत्पादकांनी दूध अंगावर ओतून घेत संताप व्यक्त केला. 

यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष वाडेकर, राज्य प्रवक्ते अनिल देठे, राज्य सचिव किरण वाबळे, जिल्हा प्रवक्ते संतोष हांडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. वडगाव सावताळ येथे मागील चार दिवसांपासून (ता. पारनेर) आंदोलन सुरू आहे. यावेळी राजू रोकडे, तालुका कार्याध्यक्ष संजय भोर, शाखा अध्यक्ष अर्जुन रोकडे, उपाध्यक्ष संदीप रोकडे, संदीप व्यवहारे, दादाभाऊ रोकडे यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. 

दुधाला योग्य मोबदला मिळत नसल्याने मागील 4 दिवसांपासून सर्वत्र आंदोलन चालू आहे. मात्र सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देत नसेल, तर प्रसंगी शेतकर्‍यांचा संयम सुटल्यास त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा वाडेकर यांनी यावेळी दिला.