Wed, Jul 17, 2019 12:44होमपेज › Ahamadnagar › निधाने खूनप्रकरणी पोलिस ठाण्यावर मोर्चा

निधाने खूनप्रकरणी पोलिस ठाण्यावर मोर्चा

Published On: Apr 21 2018 12:58AM | Last Updated: Apr 20 2018 11:27PMराहाता : प्रतिनिधी

रामदास निधाने खूनप्रकरणातील  खरे आरोपी अजून मोकाट असून त्यांना अटक करा. जर तुमच्यावर राजकीय दडपण येत असेल तर या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे द्या. आरोपींना अटक न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला.   राहाता येथे शहरातील नागरीकांनी रामदास निधाने या तरुणाचा खून करणार्‍या आरोपींना पोलिसांनी अटक करावी व हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासून मुख्य आरोपींना पोलिसांनी ताब्यात घ्यावे. या मागणीसाठी पोलिस ठाण्यावर मोर्चा नेऊन  नागरीकांनी पोलिस अधिकार्‍यांना निवेदन दिले.    निधाने याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. त्याच्यावर गरम पाणी ओतून त्याला मारहाण केली. त्याचा गळा दाबून खून करण्यात आला.

पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह हॉटेल शिवनेरीच्या बाहेर आणून टाकला. हॉटेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेर्‍यात असलेल्या फुटेजमध्ये छेडछाड  करण्यात आली. मुख्य आरोपींना अटक न करता पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढण्यासाठी अल्पवयीन असलेल्या हॉटेलमालकाच्या नातेवाईक व अन्य दोन वेटरांची नावे या खुनात दाखविली. पोलिस हा तपास कासव गतीने करीत आहेत. ज्या हॉटेलमध्ये युवकाचा खून झाला त्या हॉटेल मालकाची पोलिसांनी चांगल्या प्रकारे चौकशी करणे गरजेचे होते. परंतु त्यांना त्यांची सखोल चौकशी पोलिसांनी केली नाही. दरम्यान, घटनेनंतर पोलिसांनी हॉटेलमालकाला याप्रकरणाबाबत विचारले असता, सदरचा तरुण हा हॉटेलमध्ये आलाच नाही. त्यांना आम्ही ओळखत नाही, असे सांगून पोलिसांची दिशाभूल केली.

Tags : Ahmadnagar, rally, police, station,  murder,  Nidhana